मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

आदित्य ......... आयुष्याची एक सुरवात


तुजे नाव म्हणजे सुरवात   ....
नव्या आयुष्याची, नव्या दिवसाची, नव्या जीवनाची ,
तूच माज्या जीवनाचा शिल्पकार ,
तूच या मूर्तीचा मूर्तिकार ,
तुज्या हातूनच घडले माज्या जीवनाचे शिल्प ,
तुज्या शब्दातूनच जगले मी हे आयुष्य अल्प ,
तुज्या नसण्यात आहे माज्या जीवनाचा अंत ,
कारण तुज्या नावातच आहे माज्या जीवनाचा आरंभ ,......

मी .....

स्वप्नाविश्वतली स्वप्न वेडी मी .........
भावविश्वातली भावली मी  .........
कितीही बोलले तरी अबोल मी  .........
कितीही जगले तरी मृत मी  .........
मनाच्या गुंतात गुंतालीली मी  .........
बाहेरील विश्वात हरवलेली मी .........
स्वतातील सत्वाच्या शोधात मी .......
प्रियकराच्या आत्म्यात वसलेली मी  .........
किती रुपात वाटले गेलेली मी  .........
तरीही स्वताच स्वताला अजूनही शोधतेय मी  .........

...एक नविन विश्वास...

कोरड्या झालेल्या ओठांवरुन
हलकेच जिभ फ़िरवली
मान फ़िरवुन ... नजर चोरली...
बहुदा... मनातली चलविचल नकळत लपवली..
''तू... ........................ !!''
ती म्हणाली काल जेव्हा....
झोंबरा वारा अंगावर झेलत ...
तळहातावर फ़ुंकर घालत...
नखाने माती उकरत...
तिने डोळ्यांतुन वाहणारा पुर थांबवत...
'' तुला ना................ ''
ती म्हणाली काल जेव्हा....
दर वेळी नविन अर्थ निघतो
तिच्या ''तू'' ..''तु .. ना'' मधुन
आकलनाच्या बाहेर असतात
त्या कंसातल्या वाक्याचे अर्थ...
मी नेहमीच हतबल तिच्या समोर...
ती जोरदार हल्ला करते ...
स्व:ताच म्हणन पटवुन देते
खर तर ती दुसरी कुणी नसते,
माझ्यातालीच 'मी ' असते...
एक नविन विश्वास...
स्व:ताला ओळखण्याची कुवत
ती नेहमीच मला देत असते...
मला मी परत एकदा नव्याने भेटले
एका नविन आत्मविश्वासाने ....
ती म्हणाली काल जेव्हा....
''यु आर द बेस्ट''

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल........

वाटलं नव्ह्तं मला, असं काही घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडेल
याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता
त्या दिवसात रोजच, दिवाळी पाडवा होता
जेव्हा रडत होते , तेव्हा मैत्रीनेच हसवलं
नुकतच हसायला शिकले , आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं
चुक तुझी ही नसावी, किंवा माझी ही नसावी
काय सांगावं आपल्या, दैवातच खोट असावी
कारणा शिवाय दुरावले , याचच वाईट वाटतं
रडून रडून शेवटी, डोळ्यातलं पाणी आटतं
विसरुन सारं दु:ख, मी मनाला हवं आवरयला मला माहितीय
मी परतनार असेल तर, तू तयार आहे सावरायला
मी परते पर्यंत तू माझी वाट पाहशील
आत्ताच काय ? अजन्म मी तुजी आणि तू माझाच मित्र राहशील
जपुन पावलं टाकत जा, चुकुनही घसरु नकोस
भेटलो नाही कधी , तरी मला विसरु नकोस
वाटलं नव्ह्तं खरचं, कधी असं घडेल
आपल्या मैत्रीच्या वृक्ष , असा कोलमडून पडे

स्वप्नं-पक्षी ....


एक शब्द मोती झाला,
भावनेच्या शिंपल्यात बंद झाला;

एक शब्द अश्रू झाला,
पापणीच्या काठावरच तिजुन गेला;

एक शब्द सूर झाला,
हृद याच्या तारा छेडीत गेला ;

एक शब्द उचावास झाला ,
निश्वासाचे नाते तोडून गेला ;

एक शब्द उद्वेग झाला ,
मनाच्या बंधनात बंदिस्त झाला ;

सारेच  शब्द पक्षी झाले ,
मनावकाशात विरुनी गेले ...........

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

अंतर त्याचे नि माजे...........



मला आता त्याच्या मध्ये गुंतायचे नव्हते....
खूप प्रेम करत असली त्याच्यावर तरी ,
आता मला ते सर्व काही विसरायचे होते.

खूप प्रेम असूनही त्याच्या बद्दल ,
आता मला ते कधी दाखवायचे नव्हते .
त्याच्यासाठी फुलणाऱ्या कळीला ,
तो फक्त तुझ्यासाठी नाही हे सांगायचे होते ....

माझ्याविना तुझा आयुष खूप सुंदर आहे ,
हे त्याला आता मला पटउन दायचे होते ,

मी जरी तडपणार असले त्याच्या विना ,
तरी मी आनंदी राहील हेच मला सांगायचे होते.

कारण .....
आता मला त्याच्या नव्याने थाटनार्या संसारामध्ये,
डोकावून कधी पाहिचे नव्हते.

त्याच्या आधारासाठी त्याच्या सोबत राहायचे होते पण
त्याच्या संसारात हिस्सेकारी वायचे नव्हते

कसे समजू मी त्या वेड्याला
संसार म्हजे दोन जीवाचे स्वप्न असते त्यात कोना तिसर्याला स्थान नसते

फक्त तुझ्यासाठी...................................


उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
आणि तुझी सावलीही माझ्यासाठी परकी असेल
कस सावरू मी स्वत:ला
तुला स्पर्श करून आलेला वाराही मला बोचणारा असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
माझी मिठी मात्र तुझ्यासाठी आसुसलेली असेल
कस सावरू मी स्वत:ला
तुझ्या बदललेल्या भावनांची नजर
मला छळणारी असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
माझ्या श्वासांना तुझ्या हृदयापासून वेगळ करणारा असेल
कस सावरू मी स्वत:ला
माझ्या हृदयाचा आक्रोशही
तुझ्यासाठी मुका असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल

तुझे नि माझे नाते काय ........


तुझे नि माझे नाते काय ...
कलतानाही कळत नसे ...
तू जेथून चालुनी गेलास ...
तेथे अजुनही पाउलांचे ठसे ...

मी रात्र ना संपणारी ....
तू निवांत वारा मिठीतला ...
चांदण्या टिपून घेता ...
क्षण चांदने झाला ....

तू असा आलास की ....
निसटुनी गेलास का ...
नात्यात बांधुनी मला ....
नात्यात सोडुनी गेलास का ....

नाद तू नात्याताला ...
निनाद ..... ..... भासती शब्दातले ...
तू जे जानले माझ्यातले ...
मी माझे नाते जानले ....

तुझ्या विना................


तुझ्या नी माझ्यातले नातेच मला कळत नाही
तुझा विचार केल्याशिवाय दिवसच माझा वळत नाही

तुझ्या विना मी अपूरी होते
जशी तुझ्या येण्याचीच वाट मी पाहत होते

आयुष्यातील अपुरे स्वप्न
झाले तुझ्या येण्याने पूर्ण

तुझ्या येण्याने आयुष्यातील परके दिवस आता आपले वाटू लागले आहेत
दुर्लक्ष झालेल्या प्रार्थना आता पूर्ण होऊ लागल्या आहेत

तुझ्याविना घालवलेल्या दिवसांची व्यथा मलाच कळते
आणी माझ्या आयुष्यात तुझ्या अस्तित्वाची प्रचिती कलुन चुकले

तुझ्या विना घेतलेला प्रतेक श्वास अपुरा होता
तो देह आता श्वास जणू तुझ्यासाठीच घेत होता

तुझ्या नी माझ्यात अस काय आहे
इतक्या दिवस न वळलेल्या हाताला जणू तुझाच स्पर्ष आहे

सागराचा नि लाटेचा जस नात असाव
तस तुझ नि माझ नात असाव

बस एवढीच इच्छा आहे तुझ्यापाशी
तू पाउस बनून डोळ्यात वाहण्याची
आणी हळवी झाले तर मनात रहाण्याची

अनामिक नात............

अनामिक नात
काही काही प्रश्नांची उत्तर
फार कठिण असतात..
उत्तर माहीत असूनही..
कधी कधी
सगळीच पान..
कोरी असतात..!

काही काही भावना
खरच समजाण्यापलीकडच्या असतात..
समजून उमजूनही..
कधी कधी
पापण्यान आड त्या..
दडवलेल्या असतात..!

काही काही नातीच
अनामिक असतात..
नाव ठेवल कितीही कुणीही..
तरी कश्या अगदी सहज..
रेशमगाठीनी जोडलेली असतात.

उरली नाही आता......



उरली नाही आता
जीवनात कसलीच खंत
तुझ्या पासूनच सुरुवात माझी
तुझ्या पाशीच अंत
तुज्या एका आनंदासाठी
सार दुःख गिळायचं
मी नाही उरले जरी
माझ प्रेम तरी उरवायचं
जगले तुझ्या प्रेमाखातर
प्रेमाखातर मारायचं
मरतानाही एकच इच्छा
तुझ्याच मनात भरायचं

मन वेड......

मन वेड......
मन अजुनी जळत आहे आतल्या आत
मन अजुनी तळमळत आहे आतल्या आत
मनाला ना अजुनी गवसली स्वत:ची वाट
मन दिशाहीन घुटमळत आहे आतल्या आत
मन अजुनी फ़ुल होउनी उमलत नाही
कळी अकाळी गळत आहे आतल्या आत
शब्द देखणे उभे आहे बोट धरुनी वाट
मन वेड पळत आहे सोडूनी स्वत:च हात......

एक भावना मनातली !.......

एक भावना मनातली
पुष्कळ दा ठरवल कि सांगाव तुला
पण धिरच होत नाहि ,
मनातल सार मनातच रहात
ओठांवर कहिच येत नही !
अस कशिकाय हाक देऊ मी ,
सोप वाटतय का तुला ?
मैत्रिची रीत मनातली प्रित
सगळ्याचाच विचार करायचाय मला !

म्हणुनच अपेक्षा करतेय
तुच कही बोलण्याची ,
खर तर मी हि वाट पहातेय
तुला प्रतिसाद देण्याचि !

माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळल्यात ना तुला ,
सगळ्याच गोष्टि सांगता येत नाहित
थोडस समजुन घे नं मला !!!!!

मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

तुच होतास....


हारले आयुष्यात जेव्हा केव्हा,
जगण्याचा दिलासा तुच होतास.

अडखळली कित्येक मनोगते माझी,
एक निर्भिड शब्द माझा तुच होतास.

नाते कोठले हे मनमनाचे,
अंतरी आरपार माझ्या तुच होतास.

सांग खोट कोणती नात्यात या,
शाश्वत सत्य माझे तुच होतास.

कोपर्‍यात आसवे ढाळताना,
मिश्किल हासु माझे तुच होतास.

भांडण जगाशी होत जाऊ दे रे,
माझ्यासाठी वाद माझा तुच होतास.

 "अडखळली कित्येक मनोगते माझी,
एक निर्भिड शब्द माझा तुच होतास."

शरण तुजवाचुन मी न कुणा,
असा कृष्ण  माझा तुच होतास.

आयुष्यभराची मैत्री........


तुझं आणि माझं
नातं किती वेगळं  होतं
म्हटलं तर काहीच नाही
म्हटलं तर सगळं होतं......

क्षुल्लकशा गोष्टीवरून
आपण किती रुसायचो,
राग जरा ओसरला कि
त्या गोष्टीवरच हसायचो....

मी वाट पाहणार नाही
म्हणून तुला वेळेत ये बजावायचे
आणि मग हाच नियम मोडण्यास
मीच पुढे धावायचे .....

 कधी बनून आधार
कधी सावली बनून जगलो,
कधी खूप समंजस
कधी किती खट्याळ वागलो....

भावना शब्द रूप घेतील
त्या आधीच समजून घ्यायचो,
क्षणिक भेटीतून त्या
दिवसभराचे हास्य भरून न्यायचो.....

सोबत एकमेकांची जणू
असंख्य सुखाची खात्री होती,
निस्वार्थ प्रीत ओसंडावी
अशीच आपली मैत्री होती.....

दोन क्षणांचा सहवास तो
अन आयुष्यभराची मैत्री,
आसवांचा पाऊस हा
अन आठवणींची छत्री......

माझं मन .......


कधी कधी आभाळ उगाचच भरून येत
बरसणाऱ्या धारा पाहून मन भरून येत
ओथंबून वाहते पाणी आणि मनातील भावना
काळ्या काळ्या ढगांना त्या नाही मिळत कुठे किनारा
आयुष्य आहे साधे सरळ जगायचे म्हणून जगावे
उगाचच नाही त्याला मार्गी लावावे
त्याचा रस्ता त्याला माहित असतो
आपण तर उगाचच त्यला दिशा दाखवत असतो
तो जात असतो सरळ मार्गी पण
आपण त्याला ओढत असतो प्रेमाच्या मार्गी
तो हि बिचारा येतो आपल्या मागे आणि मग ................
फसतो ,हरतो, आणि स्वताशीच हसून आभाळा कडे पाहतो
सरळ मार्ग सोडून प्रेमाच्या मार्गी का आणल म्हणून
देवालाच ओरडतो पण त्याला तरी काय माहित,
त्याच तिथे जन हे त्याच त्यांनाच ठरवलेलं
आणि त्याच्या त्या चुकीच्या निर्णयावरच तर आभाळ भरून आलेल ..............

आयुष्याची कल्पना ......


आयुष्याची कल्पना
आपल्या दोघांच्या सुंदर आयुष्याची आपण कल्पना
केली होती.
आपल्या प्रेमाला लग्नात बदलण्याची वेळ
आता आली होती.
देवासमोर लग्न करण्याची तुझी
इच्छा होती
सप्तपदी मंगलअष्टकातून आपली
जन्मोजन्मीची साथ होणार होती
वाळूच ते घर प्रत्यक्षात उतरणार होत
आपल्या सुंदर आयुष्याच एक नवं स्वप्न उमलणार होत
आपल्या त्या घरात दोघांशिवाय कोणीही नव्हत
तुझ्या माझ्या प्रेमानेच एक नवं विश्व बनणार होत
सुंदर आयुष्याची स्वप्न तिथे जुळणार होती
नवी नवी वळणे तिथे घडणार होती
तुज्या साथीने मी भविष्याला पाहणार होते पण
त्या पूर्वीच भविष्याला गालबोट लागले होते
तू माझ्याशी प्रतारणा केली होतीस
जणू त्या भावनेन माझे अस्तित्वच संपून टाकल होत

तू येशीन ना??????????


अजूनही मी तुजी वाट पाहतेय, तू येशील ना?................
त्या रम्य स्वप्नात मला परत नेशीन ना?....... .........
प्रीत हि आहे तुझी आणि माझी
जाई आणि जुईच्या फुला सारखी नाजूक
आपल्या प्रीतीचे गाणे आणि गोडवा आहे त्या सप्तसुरातून
एकमेकांना साद घालत हृदयाला भिडणारा तो नाद
आणि त्याला मिळणारी ती पक्षांची चिवचिवाट
तशीच प्रेमाची साद तू पुनः घालशील  का रे ?............
तू मला परत त्या रम्य स्वप्नात नेशीन का रे ?...........
तुज्या  आठवणीत माझी  प्रत्येक रात्र झुरते 
दिवसही त्याच आठवणीत स्वताला संपवतो
 दिवस रात्रीच्या या खेळणे आता मीहि संपत आहे रे
तुला साद घालत जीवन कंठात आहे रे
एकदा तरी माघारी पावलांनी येशीन का रे ?.........
मला परत त्या रम्य स्वप्नात नेशीन का रे?.........
                                             नेशीन का रे ? नेशीन का रे???????????