शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

मी आभारी आहे ….

मी आभारी आहे
तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग त्याला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अंगण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांची सौदागर म्हणून जगले सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हि निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे

तू येतोस तेव्हा......



तू येतोस तेव्हा
डोळे तुझ्याकडेच पाहत राहतात
विसरतात ते सगळ भोवतालच जग
अन शब्दही तुझेच होऊन जातात

तू येतोस तेव्हा
दिशा साऱ्या रंगून जातात
चंद्रही होतो पोरका
अन चांदण्य स्तब्द होऊन जातात

तू येतोस तेव्हा
फुलेही ( कळ्या ) मोहरून जातात
विसरतात ते मीपण आपल
मनमोहून उजळून जातात

तू येतोस तेव्हा
वाराहि तुला स्पर्शन्यास आतुरतो
तुझ माझ प्रेम पाहून
तोही स्वताला विसरून जातो

तू येतोस तेव्हा
मन हे वेड भारावून जात
मग मीही माझी नसते
तुझ्यात स्वताला सामावून घेत

पण तू नसताना
जीव तुझ्या भेटीला व्याकूळ होतो
माझ्यातली मीच हरवून जाते
तुझ्या विऱ्हाटला एक-एक क्षण
मग तुझ्याविना मी आधुरी आहे
हे भासवून जातो...............