चंद्राविना ते चांदणे अधुरे आहे .
तुझ्या मैत्रीविना आयुष्याच अधुरे आहे तुझ्यासंगे जगताना सुखाचा अर्थ कळतो .
जगताना तुझ्यासंग माझ्या आयुष्याला अर्थ मिळतो
कसे जुळले हे अनामिक बंध
आहे त्याला प्रामाणिक प्रेमाचा गंध
हे दिवस असेच राहावे वाटतात ....
पण क्षण कसे फुलापाखारांप्रमाणे क्षणात उडून जातात ...
हातात आठवणींचे मोरपीस ठेऊन जातात ...
येण्याने तुझ्या आयुष्य भरून राहिलंय ...
आता त्या देवाकडे मागण्यासारखे काही न राहिलंय ...
एकाच मागते हे परमेश्वरा ...
सुखी ठेव नेहमी त्याला ...
वाटेतली दुख हवे तर दे मला ...