बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

सूर गवसला ....


ओला सुगंध श्वासात भरुन
मन स्वच्छंदी पाखरु होते
धुक्याच्या पटलाआडुन हळुच
ढगांना स्पर्श करीत........
नदीसवे मग खळखळुन हसते
कधी भीजलेल्या पाऊलवाटांवर
पडत सावरत मुक्त भटकते
तर कधी हिरवळीच्या गालीच्यावर
शांत पहुडते........
सरसरणा‍‍र्‍या सरींसोबत फेर धरुन
चिंब भिजते........
त्याच क्षणी माझे मन
मला हरवुन गवसते.....

तुझ्या विना मी अधुरी ....


चंद्राविना ते चांदणे अधुरे आहे .
तुझ्या मैत्रीविना आयुष्याच अधुरे आहे 
तुझ्यासंगे जगताना सुखाचा अर्थ कळतो .
जगताना तुझ्यासंग माझ्या आयुष्याला अर्थ मिळतो 
कसे जुळले हे अनामिक बंध 
आहे त्याला प्रामाणिक प्रेमाचा गंध 
हे दिवस असेच राहावे वाटतात ....
पण क्षण कसे फुलापाखारांप्रमाणे क्षणात उडून जातात ...
हातात आठवणींचे मोरपीस ठेऊन जातात ...
येण्याने तुझ्या आयुष्य भरून राहिलंय ...
आता त्या देवाकडे मागण्यासारखे काही न राहिलंय ...
एकाच मागते हे परमेश्वरा ...
सुखी ठेव नेहमी त्याला ...
वाटेतली दुख हवे तर दे मला ...

गोड नाते हे जन्मांतरीचे —


एक मी एक तू,
शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू
साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू
साऱ्यात तू

पंख लाऊनी, उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझी मी माझा तू , कधी केंव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रीत ही, हे स्वप्न नवे

या भोवताली, काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, काही बाकी उरेना
होतो कुठे अन, आलोतं कोठे
रस्ता कुठे जाई कसा, काही कळेना

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे —

माझा श्वास फक्त तुझासाठी .......

तुला न पाहता तुज्यावर ठेवलेला विश्वास
तुला न पाहता तुझा धरलेला हात,
आयुष्यात कधीचं सोडणार नाही..
माझ्या न कळतच माझ्या मनाने
तुझ्यासोबत जोडलयं ह्रदयाचं नातं,
जोपर्यंत जीवात जीव आहे ,श्वासात श्वास आहे ,
तो पर्यंत तर सगळेच जगतात , पण मी जगते
तुझा माझ्यावर असलेल्या विश्वासावर,
माझ्यावर असलेल्या प्रेमावर जो पर्यंत ते आहे
तो पर्यंत मी मरणार नाही
मरेपर्यन्त तरी तुला विसरणार नाही.

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

कळेल का कधी मला ???


तुझ्याशी बोलाव अस नेहमीच 
वाटत मला,
कितीही बोललं तरी बोलतच
रहावस वाटत मला !

तू भेटावास असही वाटत मला
भेटलास कि तुझ्या त्या 
हसऱ्या डोळ्यांत झोकून
द्यावास वाटत मला !

तुझ बोलन कधी खोडकर तर
कधी अजमावाल्यासारख .
तुझ बघण कधी मिश्कील,
कधी अंतरीचा ठाव घेतल्यासारख !

आनं तुज ते हसण
निखळ, निर्मल मनालाच 
प्रतिबिंबित केल्या सारखं
असं तू नेहमीच हवाहवासा वाटतोस,
वेड्या ह्या मनाला !

मनं पाखरू .....


ओला सुगंध श्वासात भरुन
मन स्वच्छंदी पाखरु होते
धुक्याच्या पटलाआडुन हळुच
ढगांना स्पर्श करीते ........
नदीसवे मग खळखळुन हसते
कधी भिजलेल्या पाऊलवाटांवर
पडत सावरत मुक्त भटकते
तर कधी हिरवळीच्या गालीच्यावर
शांत पहुडते........
सरसरणा‍‍र्‍या सरींसोबत फेर धरुन
चिंब भिजते........
त्याच क्षणी माझे मन
मला हरवुन गवसते.....

तुझी आणि माझी नव्यानी भेट ...



तुझी आणि माझी नव्यानी भेट 
खूप सारे प्रेम आणि छोटीशी तक्रार 
समज गैरसमज मधून नाते झाले तयार 
कधी आता नाही घेणार माघार 

खूप खूप प्रेम करू बजावले एकमेकांना 
नाही रुसयाचे नाही फुगायचे
नाही भांडायचे समजावले आम्ही स्वताला 

तुझी मी होईन मैत्रीण तर कधी तू माझा मित्र 
तू नको भोगुस आता दुःख आणि कष्ट 

पण.... लक्षात ठेव आयुष्यभर 
मला देखील नाही तुझ्याशिवाय कुणाची आस 
तूच माझा आधार आणि तूच माझा श्वास