शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

निशब्द प्रेमाची गाथा...

स्वःताहून जास्त प्रेम तुझ्यावर केले होते मी,
माझे सर्वस्व अर्पण केले होते मी..
तुझा भास, तुझा सहवास,
तुझ्याचं प्रेमात पडले होते मी..
नाही कधी मिळाले मला काही,
ना मिळाले काही मला आजहि ..
स्वप्न रंगवत होते आपली एकांतात ,
पण ?????
स्वप्नांतील रंगचं नाहीसे झाले आज..
खूप ठरवले होते मी स्वःताशीचं,
नाही पाहणार तुझ्याकडे कधीचं..
पण ?????
प्रेम होते तुझ्यावर आधीचं,
संपणार नव्हते ते आज व कधीचं..
आज तू मला सोडून गेला होतास
काळीज माझे काढून निघून गेलास
मरण सुद्धा माझ्या नशीबात का नव्हते,
आयुष्याचे चित्र रंगहीन करून गेलास
तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास ..
मला विसरून जा म्हणालास
मग का माज्या चीत्तेवर माझ्यासाठीचं रडलास ?????

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं......

कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात......
 कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
मनातील भावना मनातच राहतात 
शब्द बर्फागत मुखातच थिजतात 
गोठलेल्या शब्दातून त्या मग 
मूक वचने बाहेर येतात 
कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
काय सांगावं काय नको 
या विचारात रात्र सरुनी जाते
तेजाच्या पहिल्या किरणाने 
नव्या दिवसाची चाहूल लागते 
कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
नव्या उमेदीची, नव्या  नात्यांची , नव्या आयुष्याची 
गुंतागुंत तुज सवे सोडवावीशी वाटते 
गुंतलेल्या त्या नात्यांमधून बाहेर पडावेसे वाटते 
बंदिस्त त्या आयुष्यातून मुक्त उडावेसे वाटते 
कित्येकदा तुला  सांगावस वाटतं 
सोन्याच्या पिंजर्यातील तडफडणाऱ्या पोपटागत
बंदिनीच्या लाभलेल्या आयुष्यातून  
दूर कुठे तरी ऊंच आभाळात संचारावेसे वाटते 
बस कित्येकदा तुला  हेच सांगावेसे  वाटतं
एवढेच सांगावेसे वाटते ......... 

न त्याला कळावे न मला कळावे .....


असाव कुणीतरी माझ्या मनाचं वेध  घेणार 
न काळात माज्या मनातील भावनांना भेदणार 
प्रवेश  त्याचा मनाच्या अंतरित व्हावा 
न त्याला कळावा न मला कळावा
एकमेकांच्या मनातले नकळते भाव एकमेकास कळावे 
जणू जादुई नगरीत स्वताचे स्वप्न हरवावे 
भावनांच्या गाठोड्यात गुंताव्या त्याच्याही भावना 
त्याच्या ध्येयात साकार व्हाव्यात माझ्या कल्पना 
न कळत त्याच्या नि माज्या मनाची गुंतागुंत व्हावी 
न त्याला कळावी न मला कळावी 
नितळ प्रेमाचे नितळ मैत्रीचे 
असे हे नाते आयुष्यभराचे 
जगावे दोघांनी फक्त एकमेकांसाठी 
न त्याला कळावे न मला कळावे 
मांजरी सारखे डोळे मिटून दोघांनी प्रेम करावे 
कुणी पाहत नाही अस समजत असताना सर्व जगाने ते पाहावे