सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

कळेल का कधी मला ???


तुझ्याशी बोलाव अस नेहमीच 
वाटत मला,
कितीही बोललं तरी बोलतच
रहावस वाटत मला !

तू भेटावास असही वाटत मला
भेटलास कि तुझ्या त्या 
हसऱ्या डोळ्यांत झोकून
द्यावास वाटत मला !

तुझ बोलन कधी खोडकर तर
कधी अजमावाल्यासारख .
तुझ बघण कधी मिश्कील,
कधी अंतरीचा ठाव घेतल्यासारख !

आनं तुज ते हसण
निखळ, निर्मल मनालाच 
प्रतिबिंबित केल्या सारखं
असं तू नेहमीच हवाहवासा वाटतोस,
वेड्या ह्या मनाला !

मनं पाखरू .....


ओला सुगंध श्वासात भरुन
मन स्वच्छंदी पाखरु होते
धुक्याच्या पटलाआडुन हळुच
ढगांना स्पर्श करीते ........
नदीसवे मग खळखळुन हसते
कधी भिजलेल्या पाऊलवाटांवर
पडत सावरत मुक्त भटकते
तर कधी हिरवळीच्या गालीच्यावर
शांत पहुडते........
सरसरणा‍‍र्‍या सरींसोबत फेर धरुन
चिंब भिजते........
त्याच क्षणी माझे मन
मला हरवुन गवसते.....

तुझी आणि माझी नव्यानी भेट ...



तुझी आणि माझी नव्यानी भेट 
खूप सारे प्रेम आणि छोटीशी तक्रार 
समज गैरसमज मधून नाते झाले तयार 
कधी आता नाही घेणार माघार 

खूप खूप प्रेम करू बजावले एकमेकांना 
नाही रुसयाचे नाही फुगायचे
नाही भांडायचे समजावले आम्ही स्वताला 

तुझी मी होईन मैत्रीण तर कधी तू माझा मित्र 
तू नको भोगुस आता दुःख आणि कष्ट 

पण.... लक्षात ठेव आयुष्यभर 
मला देखील नाही तुझ्याशिवाय कुणाची आस 
तूच माझा आधार आणि तूच माझा श्वास