गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

"आयुष्य"


"आयुष्याला शब्दात मांडन अशक्य असत ..
किती ही मांडन्याचा प्रयत्न केला तरी ते अपुरच असत ...

आयुष्य आयुष्य असत...
त्यात जे व्हायच असत ते होतच असत ...
आयुष्य हे बऱ्याच नात्यात गुंतलेल असत ...
जे सोडवता सोडवत तर नाहीच पण अधिकाधिक गुंतत असत ...

आयुष्य नेमक काय ? हे खर तर कुणालाच कळत नसत ..
आणि कुणाच्या कितीही जोर लावला तरी ते पाहिजे तस वळत नसत ...

तरी हे भाबड मन, त्याला ओळखन्याच्या प्रयत्नात असत ...
नेहमी कधीही न सुटनाऱ्या कोड्याला सोडवत असत ..."

ओंजळभर नात.........


ओंजळभर नात तुझ्या नी माझ्या मैत्रीचं,
ओंजळभर नात आपल्यात रुजलेल्या प्रेमाचं,

या ओंजळीला हात तुझे नि माझे,
या विश्वाचे आपणच राणी नि राजे,

खूप विश्वासाने ओंजळ हि भरलेली,
बिना लग्नाची जणू नवरी नटलेली,

सावरलीस तिला जस बाळ नवं जन्मलेलं,
सुरवंटाचे फुलून फुलपाखरू जाहलेल,

तुझ्या खांद्यावरून उंच भरारी तिची होती,
आभाळात नव्हे तुझ्यातच सामावलेली,

काय झाले अचानक असे जे मीच बिथरली
त्या थरकापाने ओंजळ माजी सुटलेली

वाहून गेले कधी नाते, तेही लक्ष्यात न आले,
माज्या एका चुकीमुळे होत्याचे नव्हते झाले,

ज्या भरवसाने ओंजळ धरलेली,
मिटण्या ऐवजी ती उघड्यावर पडलेली,

भान येताच जागी जेव्हा कर पाहिलेला,
हारून स्वतःशी ओंजळ प्रेमास मुकलेला

सावरली ती ओंजळ माजी तूच प्रेमाने
साथ हि मागितली तू त्याच हक्काने

पुन्हा एकदा भरली माजी विश्वासाची ओंजळ
पण ठिगळागत दिसली ती भरलेली घागर

विस्कटलेल्या मनातले फिस्कटलेले प्रश्न ........


विस्कटलेल्या मनात फिस्कटलेत कित्येक प्रश्न...
शोधता उत्तर एकाचे ठाकतायंत उभे नवे प्रश्न

झाल्यानंतर चुका वाटतं झाल्याच नसत्या तर
गेल्यानंतर निघून वेळ वाटतं घड्याळाचे काटे मागे सरकवता आले असते तर

घडल्या गोष्टींचा न चुकता होतो पश्चात्ताप
पण ज्याची असते किंमत शून्य

क्षणागणिक स्वप्न आणि मनातच प्रयत्न
दुरावत यश ..कमी पडतायत कष्ट

कधी वाटतात सारे परके तर कधी सारे फक्त माझे
कधी दिसतं स्वार्थी जग तर कधी मन चिंब करणारी मैत्री
वागावं कसं.....बोलावं कसं ....मिळताच राहतात सल्ले ...

विस्कटलेल्या मनात फिस्कटलेत असेच कित्येक प्रश्न...
शोधता उत्तर एकाचे ठाकतायंत उभे नवे प्रश्न

मला पण आता श्वास घेऊ दे ....

मोकलेपणाने एकांतात स्वता साठी विचार करू दे.
खुप झाली दुनियादारी,दुसर्यासाठी जगणं अन मरणं,
आता स्वत साठी पण मरून पहु दे
आता मला सुद्धा माझा श्वास घेऊ दे...............
मला पण जगायचय आता ...पण स्वत: साठी च
राना वनात फ़क्त "मी पण " जपून फिरायचय
कोणी मन दुखवून गेल म्हणून नाही ..
"त्या" कोणाला मनात च नको येऊ दे
मला पण आता माझा श्वास घेऊ दे....
तेच तेच उधललेल्या सागराच्या लाटे सारख सारख बनुन सतत फूटने
आता बंद होऊ दे...
मनाला आता संथ नदीच ..तिथे च स्वत: साठी च थांबलेल पात्र होऊ दे.
ते त्या सागराला हि जाउन नको मिळू दे.
मला पण आता माझा श्वास घेऊ दे.
त्या हिरमुसलेल्या नात्यानी दिलेल्या अणि कधीच न भरणाऱ्या
चिघळलेल्या जखमांचा विसर पडू दे.
थंड हवेतला सुगंध अनभवू दे.
मला पण आता माझा श्वास घेऊ दे
आतल्या आत गुदमर्लेला हुंदका आता ओठाशी येऊ दे .
मनातल विष आता डोळ्यातून पाझरु दे.
जगायचय जगायचय म्हणताना च "काळ" येइल समोर
हात पुढे करेल न् बोलेल चल माझ्या सोबत
तो समोर येण्या आधी जगुन घेऊ दे
आता तरी माझा श्वास माला घेऊ दे....................................

मी म्हणजे नेमकि कोण आहे ???????


डोळ्यात स्वप्ना सामाउन झोपता येत मला,
आठवणींच्या सोबतीने जगता येत मला,
भावनांचा काहूर रोखता येतो मला,
काळजाला जाळून देखील जगता येत मला,
जर, आयुष्य रेखाटून भविष्य घडवत आहे...
खरच संग न रे किती अवघड आहे...मी... मी म्हणजे नेमकि कोण आहे.?????

सांग कशाला आलास तू ???

उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझी मीच एकटी,
सुख किती परी तयात होते,
नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,
जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
गोफ नवा मी त्वरे गुंफला,
धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशाला आलास तू???