मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

अंतर त्याचे नि माजे...........



मला आता त्याच्या मध्ये गुंतायचे नव्हते....
खूप प्रेम करत असली त्याच्यावर तरी ,
आता मला ते सर्व काही विसरायचे होते.

खूप प्रेम असूनही त्याच्या बद्दल ,
आता मला ते कधी दाखवायचे नव्हते .
त्याच्यासाठी फुलणाऱ्या कळीला ,
तो फक्त तुझ्यासाठी नाही हे सांगायचे होते ....

माझ्याविना तुझा आयुष खूप सुंदर आहे ,
हे त्याला आता मला पटउन दायचे होते ,

मी जरी तडपणार असले त्याच्या विना ,
तरी मी आनंदी राहील हेच मला सांगायचे होते.

कारण .....
आता मला त्याच्या नव्याने थाटनार्या संसारामध्ये,
डोकावून कधी पाहिचे नव्हते.

त्याच्या आधारासाठी त्याच्या सोबत राहायचे होते पण
त्याच्या संसारात हिस्सेकारी वायचे नव्हते

कसे समजू मी त्या वेड्याला
संसार म्हजे दोन जीवाचे स्वप्न असते त्यात कोना तिसर्याला स्थान नसते

फक्त तुझ्यासाठी...................................


उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
आणि तुझी सावलीही माझ्यासाठी परकी असेल
कस सावरू मी स्वत:ला
तुला स्पर्श करून आलेला वाराही मला बोचणारा असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
माझी मिठी मात्र तुझ्यासाठी आसुसलेली असेल
कस सावरू मी स्वत:ला
तुझ्या बदललेल्या भावनांची नजर
मला छळणारी असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल
माझ्या श्वासांना तुझ्या हृदयापासून वेगळ करणारा असेल
कस सावरू मी स्वत:ला
माझ्या हृदयाचा आक्रोशही
तुझ्यासाठी मुका असेल

उद्या कुणा दुसऱ्याचाच हात तुझ्या हाती असेल

तुझे नि माझे नाते काय ........


तुझे नि माझे नाते काय ...
कलतानाही कळत नसे ...
तू जेथून चालुनी गेलास ...
तेथे अजुनही पाउलांचे ठसे ...

मी रात्र ना संपणारी ....
तू निवांत वारा मिठीतला ...
चांदण्या टिपून घेता ...
क्षण चांदने झाला ....

तू असा आलास की ....
निसटुनी गेलास का ...
नात्यात बांधुनी मला ....
नात्यात सोडुनी गेलास का ....

नाद तू नात्याताला ...
निनाद ..... ..... भासती शब्दातले ...
तू जे जानले माझ्यातले ...
मी माझे नाते जानले ....

तुझ्या विना................


तुझ्या नी माझ्यातले नातेच मला कळत नाही
तुझा विचार केल्याशिवाय दिवसच माझा वळत नाही

तुझ्या विना मी अपूरी होते
जशी तुझ्या येण्याचीच वाट मी पाहत होते

आयुष्यातील अपुरे स्वप्न
झाले तुझ्या येण्याने पूर्ण

तुझ्या येण्याने आयुष्यातील परके दिवस आता आपले वाटू लागले आहेत
दुर्लक्ष झालेल्या प्रार्थना आता पूर्ण होऊ लागल्या आहेत

तुझ्याविना घालवलेल्या दिवसांची व्यथा मलाच कळते
आणी माझ्या आयुष्यात तुझ्या अस्तित्वाची प्रचिती कलुन चुकले

तुझ्या विना घेतलेला प्रतेक श्वास अपुरा होता
तो देह आता श्वास जणू तुझ्यासाठीच घेत होता

तुझ्या नी माझ्यात अस काय आहे
इतक्या दिवस न वळलेल्या हाताला जणू तुझाच स्पर्ष आहे

सागराचा नि लाटेचा जस नात असाव
तस तुझ नि माझ नात असाव

बस एवढीच इच्छा आहे तुझ्यापाशी
तू पाउस बनून डोळ्यात वाहण्याची
आणी हळवी झाले तर मनात रहाण्याची

अनामिक नात............

अनामिक नात
काही काही प्रश्नांची उत्तर
फार कठिण असतात..
उत्तर माहीत असूनही..
कधी कधी
सगळीच पान..
कोरी असतात..!

काही काही भावना
खरच समजाण्यापलीकडच्या असतात..
समजून उमजूनही..
कधी कधी
पापण्यान आड त्या..
दडवलेल्या असतात..!

काही काही नातीच
अनामिक असतात..
नाव ठेवल कितीही कुणीही..
तरी कश्या अगदी सहज..
रेशमगाठीनी जोडलेली असतात.

उरली नाही आता......



उरली नाही आता
जीवनात कसलीच खंत
तुझ्या पासूनच सुरुवात माझी
तुझ्या पाशीच अंत
तुज्या एका आनंदासाठी
सार दुःख गिळायचं
मी नाही उरले जरी
माझ प्रेम तरी उरवायचं
जगले तुझ्या प्रेमाखातर
प्रेमाखातर मारायचं
मरतानाही एकच इच्छा
तुझ्याच मनात भरायचं

मन वेड......

मन वेड......
मन अजुनी जळत आहे आतल्या आत
मन अजुनी तळमळत आहे आतल्या आत
मनाला ना अजुनी गवसली स्वत:ची वाट
मन दिशाहीन घुटमळत आहे आतल्या आत
मन अजुनी फ़ुल होउनी उमलत नाही
कळी अकाळी गळत आहे आतल्या आत
शब्द देखणे उभे आहे बोट धरुनी वाट
मन वेड पळत आहे सोडूनी स्वत:च हात......

एक भावना मनातली !.......

एक भावना मनातली
पुष्कळ दा ठरवल कि सांगाव तुला
पण धिरच होत नाहि ,
मनातल सार मनातच रहात
ओठांवर कहिच येत नही !
अस कशिकाय हाक देऊ मी ,
सोप वाटतय का तुला ?
मैत्रिची रीत मनातली प्रित
सगळ्याचाच विचार करायचाय मला !

म्हणुनच अपेक्षा करतेय
तुच कही बोलण्याची ,
खर तर मी हि वाट पहातेय
तुला प्रतिसाद देण्याचि !

माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळल्यात ना तुला ,
सगळ्याच गोष्टि सांगता येत नाहित
थोडस समजुन घे नं मला !!!!!