कोरड्या झालेल्या ओठांवरुन
हलकेच जिभ फ़िरवली
मान फ़िरवुन ... नजर चोरली...
बहुदा... मनातली चलविचल नकळत लपवली..
''तू... ........................ !!''
ती म्हणाली काल जेव्हा....
झोंबरा वारा अंगावर झेलत ...
तळहातावर फ़ुंकर घालत...
नखाने माती उकरत...
तिने डोळ्यांतुन वाहणारा पुर थांबवत...
'' तुला ना................ ''
ती म्हणाली काल जेव्हा....
दर वेळी नविन अर्थ निघतो
तिच्या ''तू'' ..''तु .. ना'' मधुन
आकलनाच्या बाहेर असतात
त्या कंसातल्या वाक्याचे अर्थ...
मी नेहमीच हतबल तिच्या समोर...
ती जोरदार हल्ला करते ...
स्व:ताच म्हणन पटवुन देते
खर तर ती दुसरी कुणी नसते,
माझ्यातालीच 'मी ' असते...
एक नविन विश्वास...
स्व:ताला ओळखण्याची कुवत
ती नेहमीच मला देत असते...
मला मी परत एकदा नव्याने भेटले
एका नविन आत्मविश्वासाने ....
ती म्हणाली काल जेव्हा....
''यु आर द बेस्ट''
हलकेच जिभ फ़िरवली
मान फ़िरवुन ... नजर चोरली...
बहुदा... मनातली चलविचल नकळत लपवली..
''तू... ........................ !!''
ती म्हणाली काल जेव्हा....
झोंबरा वारा अंगावर झेलत ...
तळहातावर फ़ुंकर घालत...
नखाने माती उकरत...
तिने डोळ्यांतुन वाहणारा पुर थांबवत...
'' तुला ना................ ''
ती म्हणाली काल जेव्हा....
दर वेळी नविन अर्थ निघतो
तिच्या ''तू'' ..''तु .. ना'' मधुन
आकलनाच्या बाहेर असतात
त्या कंसातल्या वाक्याचे अर्थ...
मी नेहमीच हतबल तिच्या समोर...
ती जोरदार हल्ला करते ...
स्व:ताच म्हणन पटवुन देते
खर तर ती दुसरी कुणी नसते,
माझ्यातालीच 'मी ' असते...
एक नविन विश्वास...
स्व:ताला ओळखण्याची कुवत
ती नेहमीच मला देत असते...
मला मी परत एकदा नव्याने भेटले
एका नविन आत्मविश्वासाने ....
ती म्हणाली काल जेव्हा....
''यु आर द बेस्ट''