बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

न कळले कधी, मन झाले तुझे....


न कळले कधी, मन झाले तुझे
न कळले कधी, मन झाले तुझे
श्वास-श्वास हा माझा, तुझ्या अंगाणीची फुले

तुझ्या स्वप्नांचे तारांगण, उमलवत रात्र सरे
नैनाच्या त्या तीरात , रातराणीचा भास उरे

सूर तुझाच, माझ्या रोमातून गाई
माझ्या शांत पापणी खाली थेंबाळून जाई

नको मन माझे व्यापूस, रस्त्यांचे कुणा कुठे नेणे
तू नसताना श्वास ही माझा, मला सहन ना होणे!!!