असाव कुणीतरी माझ्या मनाचं वेध घेणार
न काळात माज्या मनातील भावनांना भेदणार
प्रवेश त्याचा मनाच्या अंतरित व्हावा
न त्याला कळावा न मला कळावा
एकमेकांच्या मनातले नकळते भाव एकमेकास कळावे
जणू जादुई नगरीत स्वताचे स्वप्न हरवावे
भावनांच्या गाठोड्यात गुंताव्या त्याच्याही भावना
त्याच्या ध्येयात साकार व्हाव्यात माझ्या कल्पना
न कळत त्याच्या नि माज्या मनाची गुंतागुंत व्हावी
न त्याला कळावी न मला कळावी
नितळ प्रेमाचे नितळ मैत्रीचे
असे हे नाते आयुष्यभराचे
जगावे दोघांनी फक्त एकमेकांसाठी
न त्याला कळावे न मला कळावे
मांजरी सारखे डोळे मिटून दोघांनी प्रेम करावे
कुणी पाहत नाही अस समजत असताना सर्व जगाने ते पाहावे