कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात......
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात......
कित्येकदा तुला सांगावस वाटतं
मनातील भावना मनातच राहतात
शब्द बर्फागत मुखातच थिजतात
गोठलेल्या शब्दातून त्या मग
मूक वचने बाहेर येतात
कित्येकदा तुला सांगावस वाटतं
काय सांगावं काय नको
या विचारात रात्र सरुनी जाते
तेजाच्या पहिल्या किरणाने
नव्या दिवसाची चाहूल लागते
कित्येकदा तुला सांगावस वाटतं
नव्या उमेदीची, नव्या नात्यांची , नव्या आयुष्याची
गुंतागुंत तुज सवे सोडवावीशी वाटते
गुंतलेल्या त्या नात्यांमधून बाहेर पडावेसे वाटते
बंदिस्त त्या आयुष्यातून मुक्त उडावेसे वाटते
कित्येकदा तुला सांगावस वाटतं
सोन्याच्या पिंजर्यातील तडफडणाऱ्या पोपटागत
बंदिनीच्या लाभलेल्या आयुष्यातून
दूर कुठे तरी ऊंच आभाळात संचारावेसे वाटते
बस कित्येकदा तुला हेच सांगावेसे वाटतं
एवढेच सांगावेसे वाटते .........