त्या रम्य स्वप्नात मला परत नेशीन ना?....... .........
प्रीत हि आहे तुझी आणि माझी
जाई आणि जुईच्या फुला सारखी नाजूक
आपल्या प्रीतीचे गाणे आणि गोडवा आहे त्या सप्तसुरातून
एकमेकांना साद घालत हृदयाला भिडणारा तो नाद
आणि त्याला मिळणारी ती पक्षांची चिवचिवाट
तशीच प्रेमाची साद तू पुनः घालशील का रे ?............
तू मला परत त्या रम्य स्वप्नात नेशीन का रे ?...........
तुज्या आठवणीत माझी प्रत्येक रात्र झुरते
दिवसही त्याच आठवणीत स्वताला संपवतो
दिवस रात्रीच्या या खेळणे आता मीहि संपत आहे रे
तुला साद घालत जीवन कंठात आहे रे
एकदा तरी माघारी पावलांनी येशीन का रे ?.........
मला परत त्या रम्य स्वप्नात नेशीन का रे?.........
नेशीन का रे ? नेशीन का रे???????????