तुझं आणि माझं
नातं किती वेगळं होतं
म्हटलं तर काहीच नाही
म्हटलं तर सगळं होतं......
क्षुल्लकशा गोष्टीवरून
आपण किती रुसायचो,
राग जरा ओसरला कि
त्या गोष्टीवरच हसायचो....
मी वाट पाहणार नाही
म्हणून तुला वेळेत ये बजावायचे
आणि मग हाच नियम मोडण्यास
मीच पुढे धावायचे .....
कधी बनून आधार
कधी सावली बनून जगलो,
कधी खूप समंजस
कधी किती खट्याळ वागलो....
भावना शब्द रूप घेतील
त्या आधीच समजून घ्यायचो,
क्षणिक भेटीतून त्या
दिवसभराचे हास्य भरून न्यायचो.....
सोबत एकमेकांची जणू
असंख्य सुखाची खात्री होती,
निस्वार्थ प्रीत ओसंडावी
अशीच आपली मैत्री होती.....
दोन क्षणांचा सहवास तो
अन आयुष्यभराची मैत्री,
आसवांचा पाऊस हा
अन आठवणींची छत्री...... म्हटलं तर सगळं होतं......
क्षुल्लकशा गोष्टीवरून
आपण किती रुसायचो,
राग जरा ओसरला कि
त्या गोष्टीवरच हसायचो....
मी वाट पाहणार नाही
म्हणून तुला वेळेत ये बजावायचे
आणि मग हाच नियम मोडण्यास
मीच पुढे धावायचे .....
कधी बनून आधार
कधी सावली बनून जगलो,
कधी खूप समंजस
कधी किती खट्याळ वागलो....
भावना शब्द रूप घेतील
त्या आधीच समजून घ्यायचो,
क्षणिक भेटीतून त्या
दिवसभराचे हास्य भरून न्यायचो.....
सोबत एकमेकांची जणू
असंख्य सुखाची खात्री होती,
निस्वार्थ प्रीत ओसंडावी
अशीच आपली मैत्री होती.....
दोन क्षणांचा सहवास तो
अन आयुष्यभराची मैत्री,
आसवांचा पाऊस हा