गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

मला पण आता श्वास घेऊ दे ....

मोकलेपणाने एकांतात स्वता साठी विचार करू दे.
खुप झाली दुनियादारी,दुसर्यासाठी जगणं अन मरणं,
आता स्वत साठी पण मरून पहु दे
आता मला सुद्धा माझा श्वास घेऊ दे...............
मला पण जगायचय आता ...पण स्वत: साठी च
राना वनात फ़क्त "मी पण " जपून फिरायचय
कोणी मन दुखवून गेल म्हणून नाही ..
"त्या" कोणाला मनात च नको येऊ दे
मला पण आता माझा श्वास घेऊ दे....
तेच तेच उधललेल्या सागराच्या लाटे सारख सारख बनुन सतत फूटने
आता बंद होऊ दे...
मनाला आता संथ नदीच ..तिथे च स्वत: साठी च थांबलेल पात्र होऊ दे.
ते त्या सागराला हि जाउन नको मिळू दे.
मला पण आता माझा श्वास घेऊ दे.
त्या हिरमुसलेल्या नात्यानी दिलेल्या अणि कधीच न भरणाऱ्या
चिघळलेल्या जखमांचा विसर पडू दे.
थंड हवेतला सुगंध अनभवू दे.
मला पण आता माझा श्वास घेऊ दे
आतल्या आत गुदमर्लेला हुंदका आता ओठाशी येऊ दे .
मनातल विष आता डोळ्यातून पाझरु दे.
जगायचय जगायचय म्हणताना च "काळ" येइल समोर
हात पुढे करेल न् बोलेल चल माझ्या सोबत
तो समोर येण्या आधी जगुन घेऊ दे
आता तरी माझा श्वास माला घेऊ दे....................................