विस्कटलेल्या मनात फिस्कटलेत कित्येक प्रश्न...
शोधता उत्तर एकाचे ठाकतायंत उभे नवे प्रश्न
झाल्यानंतर चुका वाटतं झाल्याच नसत्या तर
गेल्यानंतर निघून वेळ वाटतं घड्याळाचे काटे मागे सरकवता आले असते तर
घडल्या गोष्टींचा न चुकता होतो पश्चात्ताप
पण ज्याची असते किंमत शून्य
क्षणागणिक स्वप्न आणि मनातच प्रयत्न
दुरावत यश ..कमी पडतायत कष्ट
कधी वाटतात सारे परके तर कधी सारे फक्त माझे
कधी दिसतं स्वार्थी जग तर कधी मन चिंब करणारी मैत्री
वागावं कसं.....बोलावं कसं ....मिळताच राहतात सल्ले ...
विस्कटलेल्या मनात फिस्कटलेत असेच कित्येक प्रश्न...
शोधता उत्तर एकाचे ठाकतायंत उभे नवे प्रश्न